आणि मराठी म्हणाली

Attention: open in a new window. PDFPrintE-mail

blank_page

blank_pageआणि मराठी म्हणाली

 

मी मराठी बोलतेय ------- काय बोलू समजत नाहीय तरीही काही तरी

 

बोलणारचं आज मी माझ्याच घरात परकी झाली आहे. माझीच मुलं

 

झिडकारत आहे . जो बघावा तो मला हिनवत आहे. जिथे मी जगले---------

 

- वाढले, जिथे संत ज्ञानेश्वरासारख्या थोर संताने माझी स्तुती ,, अमृताशी हि

 

पैज जिंके ,, अशी केली आहे. तिथेच आज मला पराश्रिता प्रमाणे आयुष्य

 

काढायची वेळ आलीय. कोणीतरी म्हणत होत ,, तु फार काळ जगनार

 

नाहिस , तुझ आयुष्य आता संपत आलय ,, पण मी म्हणाले नाही नाही

 

माझी मुल अस अकाली मरण मला देणार नाही. आज त्यांच दुर्लक्ष निश्चित

 

झालय माझ्याकडे पण त्यांना लवकरच उमजेल. मी त्यांची माता आहे आणि

 

मग ते माझी काळजी करतील ।

पण खरंच मी जे सांगीतलं ते केवळ स्वतःचे सांत्वन करण्यासाठी आणि

 

म्हनणा-याचे तोंड गप्प करण्यासाठीच का। ते सांगणं खर झालं तर ।

जिकडे बघावे तिकडे मला घालवून द्यायचा प्रयत्न होतोय . कित्येक माता-

 

पिता तर आपल्या मुलांना माझ्याजवळ फिरकू पण देत नाहिय. त्यांच्या

 

मनावर बिंबवतात की तुझी आई ,,हि,, (म्हणजे मी मराठी ) नसुन ,,ती,,

 

(इंग्रजी) आहे । खुप खुप यातना होतात . मनाला हि शब्दांची आग सोसतांना

 

माझ्याच मुलांवर त्याची सख्खी आई सुसंस्कार करील की ती ,,परकी ,, माता

 

। ह्या मातीचे रितीरिवाज ,संस्कार , प्रथा मला जास्त माहिती आहेत . कारण

 

माझं आयुष्य ह्या मातीत गेल्यं आणि ,,ती,, काल कुठून साता समुद्रापलीकडून

 

आलीय अन् माझ्या मुलांवर काय चांगले संस्कार करणार ।

 

नाही नाही मला तिच्या बद्दल असुयाही नाही आणि तिरस्कारही नाही .

 

कारण जशी मी एक माता तशी ती ही एक माताच आहे . जगातील

 

कोणतीही माता फक्त प्रेमाचीच भाषा शिकवू शकते . दुःख फक्त याचच की

 

तिची जडण -घडण संस्कार वेगळ्या मातीतले . ती माझ्या इतकी माया

 

नक्कीच देऊ शकणार नाही . वाईट फक्त याचे वाटते की माझ्या कडे अतिर्लक्ष

 

होतय. मी वाट बघते त्या क्षणाची ज्याक्षणी माझी प्रिय मुल ,,आई ,, म्हणून

 

प्रेमाने हाक मारतील आणि मला जवळ करतील । आणि मी जगतेय पण

 

त्याचआशेवर .

ही आशाच माझ जगण्याच साधन झालय। ह्या आशापुर्तीचा दिवस लवकरच

 

यावा हीच माझी वेड्या माऊलीची माझ्या लाडक्या मुलांकडून वेडी अपेक्षा.

शितल